Kolhapuri Pandhra Rassa Recipe

कोल्हापुरी पांढरा रस्सा

 

साहित्य : १ किलो मटण , २ इंच आल , २ गड्डे लसूण , १२ मिरी , सुके खोबरे २ वाट्या , पांढरे तिळ १ वाटी , लवंग ८ , दालचिनी ८ , खसखस ४ चमचे , काजू ८/१० , धणे २ चमचे , तूप ८ चमचे , नारळ ३ , तमालपत्री (फोडणीसाठी) , मीठ चवी पुरते.

 

कृती : सर्व प्रथम खसखस, काजू थोड्या कोमट दुधात तासभर भिजवून ठेवावे. नंतर वाटून घ्यावे. बाकीचे सर्व मसाल्याचे पदार्थ वाटून घ्यावे. एका भांड्यात तूप घालून त्यात लवंग, दालचिनी, तमालपत्री, लाल मिरची, मिरीची फोडणी घालावी. स्वच्छ मटण घालून चांगले एकजीव करावे. मीठ घालून पूर्ण शिजवावे. वाटलेला मसाला घालून वाफ येऊ दयावी. मटण पूर्ण शिजल्यानंतर ३ नारळाचे दूध घालून एकजीव होईपर्यंत हलवावे. उकळी फुटू देऊ नये. –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *